सगळ्यांची लाडकी " मितवा " जोडी म्हणजे स्वप्नील आणि प्रार्थना लवकरच एका गाण्यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एवढ्या वर्षांनी या दोघांना मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. नुकतीच ही जोडी एअरपोर्ट वर स्पॉट झाली आणि आता हे दोघे पुन्हा " मितवा " रेऊनियन करणार का ? या बद्दल चर्चा रंगल्या होत्या.
अभिनयाच्या पलिकडे जाऊन स्वप्नील ने आता निर्मिती विश्वात देखील पदार्पण केलं आहे आणि त्याची निर्मिती असलेला " नाच गं घुमा " हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला सुद्धा येणार असून स्वप्नील ने त्याचा आगामी " बाई गं " या चित्रपटाच्या शूट साठी हे दोघे एकत्र आल्याचं सांगितलं आहे. " बाई गं " चित्रपटातील गाणं सोबतीने शूट करण्यासाठी " मितवा " जोडी सोबत आली आहे.
सिनेइंडस्ट्रीत या दोघांची सुपरहिट " मितवा " जोडी म्हणून अशी ओळख असताना आता " बाई गं " मध्ये हे पुन्हा सोबत दिसणार यावर शिक्कमोर्तब झाला आहे.
येणाऱ्या काळात स्वप्नील खूप वैविध्यपूर्ण भूमिका करण्यासाठी सज्ज असून निर्मितीच्या सोबतीने त्याच्या अभिनयाने सगळ्यांची मन जिंकण्यासाठी तो जोरदार तयारी करत आहे. " नाच गं घुमा " आणि " बाई गं " या दोन मोठ्या चित्रपटातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.