“वीर रस”
नवरसांमधला हा माझा सगळ्यात आवडता रस
“वीर रस” फार पूर्वी ज्या वेळेला सिनेमा व्हायचे त्या वेळेला , शृंगार रसावर , करूण रसावर , आधारलेले बरेचसे सिनेमे असायचे, मग त्या काळातले ही रोज म्हणजे ट्रेजडी किंग दिलीप, कुमार देवानंद, राज कपूर, राजेश खन्ना,
फार मोजके सिनेमे वीर रसावर आधारलेले असायचे त्यात दारासिंग वगैरे हिरो असायचे,
अमिताभ बच्चनचे नऊ पिक्चर चालले नाहीत आणि बहुतेक दहावा पिक्चर जंजीर होता ज्याच्यामध्ये त्याचा वीर रस लोकांच्या समोर आला,
आणि त्याचा प्राण साहेबांबरोबर चा पोलीस स्टेशन मधला सीन खुर्चीवर लाथ मारून जेवायला तो म्हणतो “ जब तक बैटने को कहा ना जाये शराफत से खडे रहो ये पोलीस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नही “ angry young man म्हणून अमिताभ बच्चन instant Star झाला,
आमच्या शाळेत आम्हाला या वीर रसाचे सिनेमे फार आवडतं असे , शत्रुघन सिन्हा मेरे अपने मध्ये “ आये तो केह देना छेनू आया था, बहोत गर्मी है खून में तो बेशक आये मैदान मे,
आईंदा मेरे किसी भी लडके को हात लगाया तो मोहल्ले का मोहल्ला उडा दुंगा “
किंवा राजकुमार चा डायलॉग “हमको मिटा सके ये जमाने मे दम नही जमान खुद हमसे है हम जमाने से नही”
हे असे पिक्चर्स बघून मला शाळेतच असं वाटायचं की आपण पण त्यांच्यासारखं हिरो व्हायचं आणि आणि खलनायकाला बदडायचं असेच डायलॉग मारायचे ,
त्यामुळे इतक्या वर्षांमध्ये वीर रसाचे जितके roles characters माझ्या वाटेला आले ते मी कधी सोडले नाहीत ,
मग तो मराठा बटालियनचा अमर भोसले, दूरदर्शन मालिकेतला शहीद भगतसिंग, या व्हिडिओ मधला दुर्गा म्हणत्यात मला या चित्रपटातला श्याम, शशांक सोळंकी यांच्या “तू अशी जवळी रहा “ या मालिकेतला retired colonel अजय सावंतराव.
आजही मला वीर रस साकार करायला आवडतो,
वीरसातले सिनेमे पाहायला पण खूप आवडतं,
त्यातले मला आवडलेले चित्रपट म्हणजे फरान अख्तर चा भाग मिलखाभाग, विकी कौशल चा “”Uri”-“ ऊरी”
रसेल क्रोचा “ग्लॅडिएटर” प्रियंका चोप्राणी केलेला “मेरी कॉम”
मराठीत भाजी पेंढारकरांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराज
हा “छत्रपती शिवाजी” चित्रपट 1952 मध्ये प्रदर्शित झाला आणि चंद्रकांत मांडरे त्यांचे धडाकेबाज व्यक्तिमत्त्व यांना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला लोकांना खूप आवडले.
तुम्हाला असे वीर रसातले तुम्ही पाहिलेले चित्रपट आठवतायेत का ?
सौजन्य- मिलिंद गवळी यांची पोस्ट