बॉलीवूडमधील क्युट कपल म्हणजेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे त्यांच्या अफेरपासूनच फार चर्चेत होतं. काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्या लाडक्या लेकीची झलक मिडियाला दाखवली. त्यातच आता त्यांच्या नव्या घराची चर्चा सुरु आहे. रणबीर आणि आलियाचं नवं घर तयार होत असून संपूर्ण कपूर कुटुंबिय या घरात लवकरच प्रवेश करणार आहे. नुकतच सोशल मीडियावर रणबीरचा त्याच्या नव्या घरातला व्हिडिओ व्हायरल होतोय. तसेच या नव्या घराला तो त्याच्या लेकीचं नाव देणार आहे.
रणबीर आणि आलियाने त्यांच्या या नव्या घरासाठी मुंबईतील वांद्रे परिसराची निवड केली आहे. याच परिसरात अनेक बॉलीवूडकरांची घरं आहेत. मागील वर्षापासून त्यांच्या या बंगल्याचं काम सुरु आहे. खरंतर हा बंगला दिवंगत ज्येष्ठ नेते राज कपूर आणि त्यांची पत्नी कृष्णा राज कपूर यांच्या नावावर होता. पण आता रणबीर हा कपूर कुटुंबातला एकुलता एक नातू असल्याने त्याच्याकडे ही मालमत्ता सोपवण्यात आली.
सध्या बॉलीवूडकरांच्या घरांच्या यादीमध्ये शाहरुख खानचा मन्नत आणि अमिताभ बच्चन यांच्या जलसाचा समावेश होता. पण त्यांच्यापेक्षाही रणबीर आलियाचं हे नवं घर महागडं असणार असल्याचं बॉलीवूड लाईफच्या सूत्रांनी म्हटलं. तसेच या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणबीर आणि आलियाने एकत्र या त्यांच्या नव्या घरात पैसे गुंतवले आहेत. त्यातच असंही म्हटलं जातंय की, त्यांची लेक राहाचं नाव या घराला देण्यात येणार आहे.
रणबीर आणि आलियाची मालमत्ता
या आलिशान बंगल्याशिवायच वांद्र परिसरातच रणबीर आणि आलियाचे ४ फ्लॅट्स आहेत. या फ्लॅट्सची किंमत जवळपास ६० कोटींपेक्षा जास्त आहे. दरम्यान या बंगल्याच नीतू कपूर या देखील रणबीरसोबत मालकीण असणार आहेत. कारण दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांच्या सर्व मालमत्तेची अर्धी जबाबदारी नीतू यांच्याकडे सोपवली होती. नीतू कपूर यांनी नुकतच वांद्रे परिसरात १५ कोटींचं घर खेरदी केल्याची माहिती सध्या समोर आली होती.