Close

आपल्या मैत्रीणींना आईचे दागिने नेऊन द्यायचा रणबीर, द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो मध्ये बहिणीने केली पोलखोल (Ranbir Kapoor Makes Shocking Rvelations In The Kapil Show)

कपिल शर्माचा शो द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो 30 मार्चपासून एका नव्या स्टाईलमध्ये सुरू होत आहे. पहिल्याच एपिसोडमध्ये कपूर फॅमिली पाहायला मिळणार आहे. नीतू कपूर, रणबीर कपूर, रिद्धिमा कपूर साहनी या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये दिसणार असून या शोचा प्रोमो सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. कपूर कुटुंबीय एकमेकांशी ज्या प्रकारे वागतात, त्यामध्ये एकमेकांची मजा घेतात हे पाहणे फार मजेशीर आहे. या एपिसोडमध्ये रणबीरने अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत.

या शोमध्ये रणबीर कपूरने अनेक रंजक खुलासे केले. तो त्याच्या आईचे दागिने त्याच्या मैत्रिणींना कसे देत असे याबद्दलही सांगितले. शोमध्ये रणबीरने रिबन कापताच कपिल शर्मा आणि सर्वजण मस्तीच्या मूडमध्ये आले. कपिलने रणबीरला विचारले की त्याने कधी बहीण रिद्धिमाचे कपडे आपल्या मैत्रिणींना दिले आहेत का? यावर रणबीर म्हणतो, मी आईचे दागिनेही दिले आहेत. रिद्धिमाचे कपडेही तो मैत्रिणींना द्यायचा. यावर रिद्धिमा प्रतिक्रिया देते आणि म्हणते की आमच्या पिढीने खूप मजा केली.

यानंतर अर्चना पूरण सिंहने रणबीर कपूरला विचारले की तू राहा चे डायपर कधी बदलले आहेत का? यावर अभिनेता म्हणतो, मी बर्प स्पेशालिस्ट होतो. म्हणजे आपल्या मुलीला ढेकर काढण्यात तो माहीर होता. यानंतर नीतू राहा आणि रणबीरच्या बाँडिंगबद्दलही बोलते. तिने सांगितले की राहा खोलीत प्रवेश करते तेव्हा रणबीरचा चेहरा उजळतो. राहाला शोमध्ये आणण्यासाठी तो उत्सुक असल्याचेही रणबीरचे म्हणणे आहे.

यानंतर सुनील ग्रोव्हरही गुत्थीच्या गेटअपमध्ये एंट्री करतो आणि मग प्रोमोमध्ये इतके मजेदार क्षण दिसतात की लोक शोची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत जेणेकरून त्यांचे मनोरंजन पुन्हा सुरू होईल.

कपिल शर्माच्या कॉमेडी शोचा नवा सीझन लवकरच 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या नावाने सुरू होणार आहे. यावेळी हा शो टीव्हीवर नाही तर OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रसारित केला जाईल. सुनील ग्रोव्हरही 7 वर्षांनंतर या शोमध्ये पुनरागमन करत आहे, त्यामुळे चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Share this article