Close

शर्माची सारखे माझे फोटो काढायचे अन् मी… कंगनाने शेअर केली बालपणीची आठवण (Kangana Ranaut Childhood Photos and stories )

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वक्तव्यांमुळे, तिच्या स्टाइलमुळे दररोज मीडियामध्ये चर्चेत असते. कोणत्याही विषयावर आपले परखड मत मांडायला मागे पुढे न पाहणारी कंगना आज आपला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. कंगना सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.


चित्रपटांसोबतच ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. बरेचदा वेगवेगळ्या पोस्टमधून ती तिचे किस्सेही सांगते. कंगनाने काही काळापूर्वी तिच्या ट्विटर अकाऊंटवर बालपणीचे सुंदर फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये कंगना खूपच क्यूट दिसत होती. बालपणीच्या आठवणी ताज्या करत कंगनाने हे फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना कंगनाने एक सुंदर कॅप्शनही लिहिले आहे.


कंगनाने लिहिले की, फोटोशूट करण्यासाठी मी अनेक क्लासेस बंक केले. मी शर्मा काकांच्या स्टुडिओत फोटोशूटसाठी जायचे. शर्मा काका माझे खूप सुंदर फोटो काढायचे आणि माझे कौतुकही करायचे. शर्मा काका त्यांच्या स्टुडिओच्या भिंतींवर माझी फोटो लावायचे.


फोटो शेअर करताना कंगनाने स्वतःबद्दल लिहिले की, मी जन्मापासूनच स्वॅग करते, ज्या वयात लोक कॅमेऱ्यासमोर येण्यास कचरतात, त्या वयात मी कॅमेऱ्यासमोर पोज देत होते. या फोटोंमध्ये कंगना शाळेचा ड्रेस परिधान करुन दिसली. कंगनाच्या चाहत्यांनीही या पोस्टवर खूप लाईक आणि कमेंट केली होती.
याशिवाय कंगनाने असे काही फोटोही शेअर केले मिळाले, ज्यामध्ये तिच्यासोबत तिच्या गावाचे सौंदर्यही पाहायला मिळाले. कंगनाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कंगनाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती शेवटची तेजस या सिनेमात दिसलेली.

Share this article