Close

करिश्मा कपूरचं खरं नाव काय माहितीय? ३३ वर्षांनी अभिनेत्रीनेच केला खुलासा ( Karisma Kapoor Said Her Real Name Is Karizzma)

१९९१ मध्ये 'प्रेम कैदी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीने अलीकडेच तिचे नाव प्रत्यक्षात कसे उच्चारले जाते याबाबत सांगितले. तिचे खरे नाव ऐकून तिच्यासोबत उपस्थित असलेले पंकज त्रिपाठी आणि सारा अली खानही चकीत झाले.  हे ऐकून पंकज त्रिपाठी आश्चर्यचकित झाले.

नेटफ्लिक्स इंडिया यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये मुलाखतकार निलेश मिश्राने करिश्माला विचारले की तिचे नाव उच्चारण्याची योग्य पद्धत कोणती आहे? यावर करिश्मा कपूर म्हणाली, 'माझ्या नावाचा उच्चार करिझ्मा आहे, करिश्मा नाही.'

हे ऐकून पंकज त्रिपाठी आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले की, 'मलाही हे आजच कळले.' तेव्हा सारा अली खान म्हणाली, 'पण तू कधी कोणाला ते सुधारायला का सांगितले नाहीस?' यावर करिश्माने उत्तर दिले, 'कारण आता बरीच वर्षे झाली आहेत, आता ज्यांना जे काही बोलायचे असेल ते बोलून दे, ते प्रेमानेच म्हणतात. यावर विजय वर्मा म्हणाला, 'मी तिला नेहमी लोलोच म्हणतो.'

करिश्माने हे देखील उघड केले की तिची आणि बहीण करीना कपूरची मुळं ब्रिटिश आहेत, कारण त्यांची आजी म्हणजेच अभिनेत्री बबिताची आजी मूळ ब्रिटिश होती. ती म्हणाली, “मोठे झाल्यावर आमच्याकडे क्लब कल्चर होते. माझी आजी ब्रिटीश होती, त्यामुळे माझी आजी आणि आजोबा नेहमी सुंदर साड्या आणि मोत्यांचे हार घालून क्लबमध्ये जात असत. आम्हीही त्यांच्यासोबत जायचो. ती संस्कृती मी एका खास पद्धतीने पाहिली आहे. बरेच नियम होते, तिथे एक कार्ड रूम असायची जिथे मुलांना परवानगी नव्हती. म्हणूनच आम्ही खोलीत डोकावून बघायचो तिथे काय चाललंय, कोणती आंटी कुठली बॅग आणते वगैरे वगैरे....

Share this article