साहित्य : शिजवलेलं पुरण, समप्रमाणात गव्हाचं पीठ आणि मैदा, मोहनासाठी तेल, स्वादानुसार मीठ, साजूक तूप.
कृती : गव्हाचं पीठ, मैदा आणि मीठ एकत्र करून, त्यात तेलाचं मोहन घाला. त्यात तेवढ्याच प्रमाणात पाणी घालून मऊ पीठ मळा. या पिठाचे सम आकाराचे गोळे करून काही वेळासाठी तसेच झाकून ठेवून द्या.
मोठ्या पोळपाटावर किंवा परात पालथी करून त्यावर पिठाच्या दोन गोळ्यांच्या जाडसर लाट्या तयार करून घ्या. त्यांपैकी एका लाटीवर (साधारण पिठाच्या एका गोळीपेक्षा जास्त) पुरण पसरवून त्यावर दुसरी लाटी ठेवून कडा व्यवस्थित बंद करून घ्या. आता ही लाटी लाटायला सुरुवात करा. ही लाटी पोळपाट किंवा परातीच्या आकाराएवढी मोठी झाल्यावर अलगद दोन्ही हातांवर घेऊन हळुवारपणे एका दिशेने गोलाकार फिरवत (रुमाली रोटीप्रमाणे) मोठी करा.
शेगडीवर मोठी कढई पालथी घालून गरम करा. त्यावर हातावर घडवलेले हे मांडे घालून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या. त्यावर साजूक तूप पसरवून मांड्यांची घडी घाला. साधारण 200-250 ग्रॅमची ही एक पोळी दूध किंवा कटाच्या आमटीसोबत स्वादिष्ट लागते.
खानदेशी मांडे (Khandeshi Mande)
Link Copied