Close

मुलीला भावंड देऊ न शकल्याची सल राणीच्या मनात कायम, कोविडच्या काळात झालेला गर्भपात  (‘I Tried For A Second Child For 7 Years’ Rani Mukerji Opens Up On Miscarriage)

सुपर टॅलेंटेड राणी मुखर्जीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला आणि तिच्या ताज्या मुलाखतीत तिने दुस-यांदा आई होऊ न शकल्याची वेदना शेअर केली. राणीने या मुलाखतीत तिच्या गर्भपाताबद्दलही बरेच काही सांगितले.

राणीने सांगितले की, तिला आपल्या मुलीला भाऊ किंवा बहीण द्यायचे होते. तिने सात वर्षे सातत्याने प्रयत्न केले पण ती यशस्वी होऊ शकली नाही.

'गलता इंडिया'शी बोलताना राणी म्हणाली की, माझी मुलगी दीड वर्षांची असताना मी दुसऱ्या बाळाची योजना सुरू केली होती आणि मी प्रेग्नंटही राहिले पण माझा गर्भपात झाला जो माझ्यासाठी धक्कादायक होता.

46 वर्षीय राणीने सांगितले की, कोविड दरम्यान गर्भपात झाल्यामुळे झालेल्या वेदना आणि दुःखातून मी आजपर्यंत सावरू शकलेली नाही. अभिनेत्री म्हणाली की माझी मुलगी आता 8 वर्षांची आहे आणि मला दुसरे मूल होण्याच्या वयात नाही. मी माझ्या मुलीला भाऊ किंवा बहीण देऊ शकले नाही याची मला नेहमीच खंत राहील.

राणी 2020 मध्ये गर्भवती होती, पण गर्भधारणेच्या 5 महिन्यांनंतर तिचा गर्भपात झाला. अभिनेत्री म्हणाली की जरी मी माझ्या मुलीला भावंड देऊ शकले नाही आणि गर्भपाताच्या आघातातून बाहेर पडू शकली नाही तरी समाधानी असले पाहिजे. राणी म्हणाली- आपल्याकडे जे आहे आणि जे नाही आहे त्याबद्दल आपण नेहमी कृतज्ञ असले पाहिजे. तुमच्याकडे जे आहे त्यात समाधान मानायला शिकले पाहिजे.

Share this article