स्त्री ही सामान्य व्यक्ती असो किंवा एखादी सेलिब्रिटी त्यांचा साडीचा विषय हा असतोच. पण सध्या सगळीकडे ट्रेंड होतेय गुलाबी साडी आणि या गुलाबी साडीवर बॉलिवूडची धक धक गर्ल पण फिदा झाली आहे.
संजू राठोडच्या ‘नऊवारी साडी’ या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं तसंच आता संजूचं लेटेस्ट गाणं ‘गुलाबी साडी’ पण सुपरहिट ठरतंय. “गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ...” ही गाण्याची ओळ आणि अर्थात संपूर्ण गाणं इतकं व्हायरल झालंय की अभिनेत्री माधुरी दीक्षितला सुध्दा रिल केल्याशिवाय राहवेना. नुकतंच माधुरी दीक्षितने ‘गुलाबी साडी’ गाण्यावर रिल केल्यामुळे संजूच्या टॅलेंटची वाहवा पुन्हा करण्यात आली.
संजू राठोडने आतापर्यंत तयार केलेल्या प्रत्येक गाण्यांनी मिलिअन व्ह्युजचा टप्पा हमखास पार केलेला आहे आणि आता ‘गुलाबी साडी’ने देखील केवळ एकाच महिन्यात युट्युबवर ११,०८६,४१७ व्ह्युज मिळवले आहेत तर या गाण्यावर इंस्टाग्रामवर ५८८K रिल्स तयार करण्यात आले आहेत. या नंबर्सचा काऊंटच संजू राठोडच्या कामाची पोच पावती आहे.