Close

५२ फ्लेवर्सच्या पाणीपुरी पाहा : ‘ओएमजी! ये मेरा इंडिया’ कार्यक्रमात शेफचा पराक्रम (Lady Chef’s Record Break Recipes In  ‘OMG! Yeh Mera India’  Series : See Paani Puri Of 52 Flavours)

पाककला आणि नावीन्यपूर्णता यांचा चविष्ट संगम साधून मुंबईतील फूड सायंटिस्ट आणि शेफ नेहा दीपक शाह यांनी आधी मास्टर शेफ सीझन ४ च्या रनर अप म्हणून लोकांची मने जिंकली आणि त्यानंतर पाणीपुरीचे ५२ चविष्ट फ्लेवर्स आणून खवय्यांना आश्चर्यचकित केले आहे. या पाककलेतून शाह यांचे अद्वितीय टॅलेंट आणि नावीन्यपूर्ण काम तर दिसलेच आहे पण त्याचबरोबर भारतीय खाद्यसंस्कृतीच्या वैविध्यपूर्णतेला त्यांनी एक आयाम दिला आहे. या सोमवारी, १८ मार्च रोजी रात्री ८ वाजता ‘ओएमजी! ये मेरा इंडिया’मध्ये फक्त हिस्ट्रीटीव्ही १८ वर त्यांनी कशा रितीने या जिभेवर आणि पोटातही खळबळ माजवणाऱ्या पाणीपुरीच्या ५२ फ्लेवर्स कशा बनवल्या हे पाहूया.

शाह या सोशल मीडियाचे सेन्सेशन आहेत. त्यांचे १० लाख फॉलोअर्स आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या रेसिपीज आणि विविध प्रकारच्या डिशेसमध्ये त्यांनी आणलेल्या नवनवीन फ्लेवर्समुळे ओळखल्या जातात. गुगलनेदेखील पाणी पुरी असलेल्या खास डूडलच्या माध्यमातून शेफ नेहा दीपक शाह यांचा गौरव करून त्यांच्या पाककृतीच्या जगातील महत्त्वाच्या योगदानावर प्रकाशझोत टाकला आहे. त्यांची कामगिरी जगभरातील खवय्ये आणि महत्त्वाकांक्षी शेफ्सना एक प्रेरणा ठरते. खाद्यपदार्थांच्या जगात कलात्मकता आणि मेहनत यांच्यातून अमर्याद शक्यता निर्माण होऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. पाहा हा चविष्ट इतिहास कथेच्या रूपात या सोमवारी रात्री ८ वाजता फक्त ‘ओएमजी! ये मेरा इंडिया’ वर! मुंबईतील या जिभेला पाणी सुटणाऱ्या चविष्ट पाणीपुरींचा आस्वाद घ्या. त्याचबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यातून इतर अद्भुत गोष्टी पाहा.

Share this article