अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लव्हबर्ड्स क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट अखेर लग्न करणार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा 15 मार्चला दिल्ली NCR मध्ये ITC Grand Bharat मध्ये लग्न करणार आहेत.
पुलकित आणि क्रितीच्या लग्नाच्या विधी 13 मार्चपासून सुरू होऊ शकतात.
पुलकित आणि क्रिती या दोघांचे होम टाऊन दिल्लीत आहे. त्यामुळे लव्हबर्ड्सनी लग्नासाठी दिल्लीची निवड केली.
नुकतेच क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट दिल्लीला रवाना झाले आहेत.
क्रिती खरबंदा तिच्या एअरपोर्ट लूकमध्ये निळ्या रंगाच्या लांब फ्रॉकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
लग्नाच्या आनंदाची चमक वधू-वरांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
यावेळी अभिनेत्रीने मीडियासमोर जोरदार पोज दिली.
पुलकितलाही विमानतळावर पाहण्यात आले. कॅज्युअल लूकमध्ये तो खूपच मस्त दिसत होतो.