साहित्य : 4 अंडी, 2 मोठे कांदे, 2 टोमॅटो, 1 टीस्पून, लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हळद, 4-5 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी कापलेली कोथिंबीर, मीठ आणि पाव
कृृती : कढईत तेल गरम करून कांदे बारीक कापून टाका. कांदा मऊ झाल्यावर यात हळद, लाल मिरची पावडर, कापलेली मिरची आणि मीठ टाका. बारीक कापलेला टोमॅटो टाकून मिश्रणाला तेल सुटू लागले की, अंडी फोडून टाका. मध्यम आचेवर भुर्जी सतत हलवत रहा. यामुळे ती कढईला चिकटणार नाही. भुर्जी साधारण ओलसर असतानाच कोथिंबीर टाकून आच बंद करा. पावासह अशी भुर्जी छान लागते.
Link Copied