मनोरंजन जगतातील सर्वात लोकप्रिय ड्रामा क्वीन राखी सावंतचा एक्स पती आदिल खान दुर्रानी याने कोणताही गाजावाजा न करता पुन्हा गुपचूप लग्न केले आहे. आदिल खान दुर्रानीने जयपूरमध्ये एका अभिनेत्रीशी लग्न केल्याचे समोर आले आहे.
सूत्रांनी ई टाइम्सला सांगितले की राखी सावंतचा एक्स पती आदिल खान दुर्रानी पुन्हा एकदा लग्नाच्या बंधनात अडकला आहे. हा दुसरा विवाह त्याने जयपूरमध्ये गुपचूप केला.
आदिल खानने बिग बॉस १२ फेम सोमी खानसोबत दुसरे लग्न केले आहे. या जोडप्याचा विवाह सोहळा अतिशय खाजगी होता. ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र सामील होते.
आदिल खानने सबा खानची बहिण सोमी खानशी लग्न केले आहे. आदिल खानने त्याच्या दुसऱ्या लग्नाची बातमी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. कारण तो आधीच अनेक जुन्या गोष्टींमुळे चर्चेत आहे.
आदिल खान दुर्रानीची पत्नी सोमी अली ही अभिनेत्री सबा खानची बहीण आहे. दोघेही 'बिग बॉस 12' मध्ये स्पर्धक म्हणून दिसले होते. सोमी खानने 'न्याय: द जस्टिस', 'केसरिया बालम' आणि 'हमारा हिंदुस्तान'मध्ये काम केले आहे.