नाना पाटेकर अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी समाजकार्य करताना पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा त्यांनी हा वसा हाती घेतला आहे.
नाना पाटेकर यांनी आपल्या समाजकार्यात अनेकदा शेतकऱ्यांसाठी काहीना काही केले आहे. आज तकच्या रिपोर्टनुसार, नाना म्हणाले - पूर्वी ८० ते ९०% लोक शेतकरी होते, आता ५० % शेतकरी आहेत. 'सरकारकडे आता काहीही मागू नका, आता कोणाचे सरकार आणायचे ते ठरवा,'.
राजकारणातील प्रवेशाबाबत ते म्हणाले की 'मी राजकारणात उतरलो तर माझ्या पोटात जे काही आहे ते बाहेर येईल आणि माझी पक्षातून हकालपट्टी होईल. वेगवेगळे पक्ष बदलत राहिलो तर महिनाभरात सर्व पक्ष संपतील. पण इथे आपण शेतकरी बांधवांसमोर मनापासून बोलू शकतो. नाना पुढे म्हणाले – ज्याच्यामुळे आपल्याला रोज जेवायला मिळतं त्यांचीच कोणाला पर्वा नसेल तर आम्ही तरी तुमची पर्वा का करु (सरकारची)?
या मुलाखतीत शेतकरी म्हणून जन्माला यायला आवडेल, असेही ते म्हणाले. 'मी आत्महत्या केली तरी मी शेतकरी म्हणून पुन्हा जन्म घेईन, कारण कोणताही शेतकरी आपल्याला पुढे शेतकरी म्हणून जन्म घ्यायचा नाही असे कधीच म्हणत नाही.’