सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये कियारा अडवाणीचे नाव आवर्जून घेतले जाते. तिचा चाहता वर्गही बराच मोठा आहे. येत्या काळात कियारा अनेक बिग बजेट सिनेमामध्ये पाहायला मिळेल. काही दिवसांपूर्वीच कियारा डॉन ३ या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसेल याची घोषणा करण्यात आली तेव्हा पाहून तिच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे.
कियारा अडवाणी 'डॉन ३' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी क्रिती सेननची या भूमिकेसाठी निवड केलेली. पण नंतर कियाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. कियारा आणि क्रितीची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली होती पण रणवीर सिंहला कियाराला चित्रपटात कास्ट करण्याची विनंती केली. त्यानंतर फरहानने कियाराला सिनेमाची ऑफर दिली.
''बॉलिवूड हंगामा'ने दिलेल्या माहितीनुसार, कियारा अडवाणी या सिनेमासाठी भरघोस फी आकारत असल्याचे सूत्रांकडून समोर आले . 'डॉन ३'साठी कियारा अडवाणीने १३ कोटी रुपये घेतल्याचा दावा करण्यात आला. ही तिची आतापर्यंतची सर्वात मोठी फी आहे. इतकेच नाही तर 'वॉर २'साठी मिळणाऱ्या फीपेक्षा ही रक्कम ५० टक्के जास्त असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
कियारा अडवाणी आणि रणवीर सिंह यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉन ३' २०२५ मध्ये रिलीज होणार आहे.