ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आणि बच्चन कुटुंबाची लाडकी नात आराध्या बच्चन अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगची शिकार बनते. कधी सोशल मीडिया युजर्स ऐश्वर्यावर तिची केशरचना, कधी मेकअपसाठी तर कधी ऐश्वर्याचा हात धरून चालल्यामुळे टीका करतात. लोक तिच्या त्याच हेअरस्टाइलला कंटाळलेले त्यामुळे ती कोणत्याही कार्यक्रमात दिसली की तिला खूप ट्रोल केले जायचे. मात्र आता आराध्या बच्चनचे परिवर्तन झाले असून तिला नव्या लूकमध्ये पाहून चाहते खूश आहेत.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्रीवेडिंग कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी जगभरातून सेलिब्रिटींमध्ये बच्चन कुटुंबही जामनगरला पोहोचले होते. जिथून आता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आई, बाबा, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत आराध्या फंक्शनचा आनंद लुटताना आणि डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांच्या नजरा ऐश्वर्याच्या लाडक्या आराध्यावर खिळल्या आहेत.
या इव्हेंटमध्ये आराध्याने बेबी पिंक रंगाचा लेहेंगा घातला होता. ती इतकी सुंदर दिसत होती की तिने सगळ्यांची लाइमलाइट चोरली. नवीन हेअरस्टाईल आणि नवीन मेकअप लुकमध्ये ती पूर्णपणे वेगळी दिसत आहे. तिचा हा ट्रान्सफॉर्मेशन लूक पाहून चाहते खूश झाले आणि तिची खूप प्रशंसा करु लागले.
विशेषतः तिची बदललेली हेअरस्टाईल चाहत्यांना खूप आवडली आणि सोशल मीडिया यूजर्स तिची आई ऐश्वर्याशी तुलना करु लागले. ट्विटरवरही लोक आराध्या 90 च्या दशकात तिची आई जशी दिसायची तशीच दिसते असे म्हणत आहेत. आराध्याचा हा नवा लूक पाहून अनेक यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.
शुक्रवारीच सर्व सेलिब्रिटी अनंत अंबानी राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनला पोहोचले होते, तर बच्चन फॅमिली रविवारी फंक्शनच्या शेवटच्या दिवशी जामनगरला पोहोचली. येथे त्यांनी महाआरतीमध्ये भाग घेतला, त्यानंतर त्यांनी जेवणही केले. आराध्याचा व्हिडिओ याच प्रसंगाचा आहे.