कानपूरच्या वैभव गुप्ताने सोनी टीव्हीच्या सिंगिंग रिॲलिटी शो इंडियन आयडॉलच्या 14 व्या सीझनचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्याची लढत शुभदीप दास, अनन्या पाल, आद्य मिश्रा, अंजना पद्मनाभन आणि पियुष पवार यांच्याशी होती, पण शेवटी वैभवच जिंकला.
वैभवला ट्रॉफी सोबतच २५ लाखांची बक्षीस रक्कमही मिळाली. त्यासोबत त्याला एक नवीकोरी कारही मिळाली.
शोचा फर्स्ट रनर अप सुभदीप दास चौधरी ठरला, त्याला बक्षीस म्हणून 5 लाख रुपये, सेकंड रनर अप पियुष पनवारला 5 लाख रुपये, तर तिसरी रनर अप अनन्या पालला 3 लाख रुपये मिळाले.
शोच्या जजेस श्रेया घोषाल, कुमार सानू आणि विशाल ददलानी होते. नेहा कक्कर आणि सोनू निगम यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावलेली.
वैभवला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. आता त्याला बॉलिवूडसाठी गाण्याची इच्छा आहे. वैभवने शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षणही घेतले असून आता विजेता बनून त्याने आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. चाहते वैभवचे अभिनंदन करत आहेत. मात्र, काही चाहत्यांनी त्यांचा आवडता स्पर्धक जिंकला नाही म्हणून निराशाही व्यक्ती केली.
सोनी टीव्हीच्या अधिकृत हँडलवर वैभवचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून त्यात लिहिले आहे- कानपूरचे छोटे सेठजी- वैभव गुप्ता इंडियन आयडॉल सीझन 14 चा विजेता ठरला.