गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडत आहे. जामनगरमध्ये सध्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. अंबानींच्या या. फंक्शनच्या दुसऱ्या दिवशी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी परफॉर्म केलं. शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी नाटू नाटू या गाण्यावर डान्स केला. तर याच सोहळ्यात बी-टाऊनचे पॉवर कपल म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनीही आपल्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मॉम टू बी दीपिकानं रणवीरसोबत 'गल्लां गूडियां' या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये रणवीर आणि दीपिका हे दांडिया खेळताना देखील दिसले.
दीपिका आणि रणवीर यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी खास लूक केला होता. रणवीरनं निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती, तर दीपिकानं लेहेंगा परिधान केला होता.
अनंत अंबानी आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला सैफ अली खान, जान्हवी कपूर, अजय देवगण, शाहरुख खान, आलिया भट्ट, करीना कपूर यांनी देखील हजेरी लावली.
दीपिका आणि रणवीर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "सप्टेंबर 2024". दीपिका ही सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. दीपिका आणि रणवीरच्या या पोस्टला कमेंट्स करुन नेटकऱ्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
(Photo : Social Media, Instagram)