अनंत अंबानी राधिका मर्चंटच्या प्रीवेडिंग फंक्शनला सुरुवात झाली आहे. यासाठी अमेरिकन गायिका रिहाना भारतात आली होती. तिने या ठिकाणी दमदार परफॉर्मन्स दिला. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर या खास सोहळ्याला पाहुणी म्हणून गेली होती. त्यावेळी तिला रिहानासोबत डान्स करण्याचीही संधी मिळाली. या प्रसंगाचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे.
अनंत अंबानीच्या प्रीवेडिंग फंक्शनमध्ये जान्हवीने धमाल केली. यावेळी अभिनेत्रीने रिहानाची भेट घेतली. तिच्यासोबत डान्स देखील केला. रिहानाची फॅन फॉलोइंग जगभरात आहे. जान्हवी कपूरही तिची खूप मोठी फॅन आहे. या सोहळ्यात जान्हवीला रिहानासोबत पार्टीत डान्स करण्याची संधी मिळाली.
अभिनेत्रीने रिहानासोबतच्या या खास प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती रिहानासोबत डान्स करताना दिसत आहे. दोघेही अजय अतुलच्या झिंगाट या गाण्यावर नाचत आहेत. एवढ्या मोठ्या गायिकेसोबत परफॉर्म केल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय.