Close

ग्रिल सॅण्डविच (Grill Sandwich)

साहित्य : ब्रेड स्लाइस, 1 टीस्पून बटर, 4-5 उकडलेले बटाटे, आल्याची पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट, चाट मसाला, 1 टोमॅटो, 2 कांदे, 1 टीस्पून तेल, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ.
कृती : बटाटे कुस्करून घ्या. टोमॅटो आणि कांदे गोल गोल पातळ आकारात कापा. कढईत तेल गरम करा. आल्याची पेस्ट टाकून परतून घ्या. बटाटे, मीठ, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट व चाट मसाला मिसळून परतून घ्या. बे्रडवर बटर व हिरव्या मिरचीची पेस्ट लावा. त्यावर बटाट्याचे मिश्रण टाका. वरून कांदा आणि टोमॅटोचे काप ठेवा. बटर लावलेला ब्रेड ठेवून हाताने दाबा. सॅण्डविच ग्रिल करा. टोमॅटो सॉससह सर्व्ह करा.

Share this article