सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटींच्या नावांमध्ये उर्वशी रौतेलाचे नाव वगळून चालणार नाही. उर्वशीनं तिच्या सौंदर्यानं आणि हटक्या स्टाईलनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. मनोरंजन विश्वातील वेगवेगळ्या गॉसिपिंगमध्ये देखील उर्वशी ही नेहमीच चर्चेत असल्याचे दिसून आले आहे.
उर्वशीनं काल (२५ फेब्रुवारी) रोजी तिचा ३० जन्मदिन साजरा केला. यावेळी तिच्या बर्थ डे ला चक्क गोल्डन केक कापण्यात आला. ज्याची किंमत तब्बल तीन कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. हा केक तिला हनी सिंगने गिफ्ट केला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी बर्थ डे च्या दिवशीही तिला ट्रोल केले आहे.
दुसरीकडे असेही म्हटले जात आहे की उर्वशी आणि हनी सिंह हे त्यांच्या आगामी एका म्युझिक व्हिडिओसाठी एकत्र आले आहेत. त्यानिमित्तानं गोल्डन केकचे व्हायरल झालेल्या फोटोंवरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
बर्थ डे पार्टीच्या निमित्तानं व्हायरल झालेला तो फोटो सध्या ट्रेडिंगचा विषय आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असं म्हटलं जात आहे की, उर्वशीच्या बर्थ डे च्या निमित्तानं खास २४ कॅरेट गोल्ड पासून गोल्डन केक तयार करण्यात आला आहे. त्या केकच्या किंमतीवरुन सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. असं म्हटलं जात आहे की, तो केक यो यो हनी सिंहनं उर्वशीला गिफ्ट केला आहे.
हनी सिंहनं असा दावा केला आहे की तो केक तीन कोटी रुपयांचा आहे. दुसरीकडे नेटकऱ्यांनी केवळ गोल्ड प्लेट लावून त्या केकची सजावट करण्यात आली असून प्रसिद्धीसाठी त्याची किंमत वाट्टेल तेवढी सांगितली जात असल्याचे म्हटले आहे.