नववधू रकुल प्रीत सिंगने तिच्या पहिली रसोई या विधीसाठी सासरच्या मंडळींसाठी स्वादिष्ट हलवा तयार केला. रकुलने पहिल्यांदाच सासरी बनवलेल्या या डिशचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी २१ फेब्रुवारीला गोव्यात लग्न केले. त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी हे जोडपे मुंबईत परतले, जिथे भगनानी कुटुंबात नवीन सुनेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
सासरी आल्यानंतर रकुलने आपल्या पहिल्या रसोईचा विधी पूर्ण केला, ज्याचा फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते – ऑफरिंग अ फोर. सासरी आल्यानंतर नवीन सुनेने कुटुंबातील सगळ्यांसाठी गोड पदार्थ बनवण्याच्या परंपरेचा मान राखत रकुलने अतिशय उत्साहाने घरच्यांसाठी हलवा बनविला अन चांदीच्या वाटीतून सगळ्यांना खाऊ घातला.
फोटो - इन्स्टाग्राम