Close

अभिनेता शाहीद कपूरने आपल्या मुलीसाठी सोडली ही गोष्ट ( Actor Shahid Kapoor Leaving This Thing For His Daughter)

अभिनेता शाहीद कपूर त्याच्या नुकताच रिलीज झालेल्या सिनेमामुळे चर्चेत आहे. शाहीद कपूर एका कार्यक्रमात बोलत असताना त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्याने आपल्या मुलीसाठी एक अशी गोष्ट सोडली जी लवकर सोडता येत नाही. कोणती आहे ती गोष्ट.

शाहिद कपूर सध्या त्याचा सिनेमा ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आलाय. अलीकडेच शाहिद कपूरने नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आणि अनेक खुलासेही केले. शाहिद कपूरला सिगारेट ओढण्याची सवय होती. त्याने ही त्याची सवय अखेर सोडली आहे.

शाहिद कपूर म्हणाला की, “मी स्मोकिंग करायचो. माझी मुलगी मिशा हिच्यापासून गुपचूप मी सिगारेट ओढत होतो. एके दिवशी जेव्हा मी गुपचूप सिगारेट ओढत होतो, तेव्हा मी स्वतःला विचारले की, हे मी कायम असेच करू शकत नाही. त्याच दिवशी मग मी धूम्रपान सोडण्याचा निर्णय घेतला.” नेहाचा हा शो Jio TV आणि Jio TV Plus वर स्ट्रिम होतो.

शाहिद कपूर आणि करीना रेड कार्पेटवर काही दिवसांपूर्वी आमनेसामने आले होते. तेव्हा करिनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मीडियाशी बोलताना शाहिदने यावरही मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “दोन लोक विचित्र आहेत हे कसे ठरवले जाते?” विचित्र चेहरा करून शाहिदने अशी प्रतिक्रिया दिली. रेड कार्पेटवर करिनासोबतच्या विचित्र क्षणावर शाहिद कपूरने उत्तर दिले, आम्ही एकत्र फोटो काढला असता तर…

“जर करीना आणि मी एकत्र फोटो काढले असते तर लोकांनी त्याबद्दल लिहिले आणि बोलले असते. आम्ही ‘उडता पंजाब’ ची टीम म्हणून तिथे होतो आणि मला त्याचे योग्य प्रतिनिधित्व करायचे होते. यासाठी आम्ही अशा प्रकारे उभे राहिलो की, अशी छायाचित्रे काढली जाणार नाहीत जी त्या लोकांना काढायची आहेत. जे काही वादग्रस्त आहे त्याचा अन्वयार्थ लावला जाऊ शकतो. आमच्या चित्रपटाचे योग्य प्रकारे प्रतिनिधित्व करता यावे म्हणून आम्हाला योग्य व्हायचे होते.”

शाहिद कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच TBMAUJ यात दिसतोय   नंतर ‘देवा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत पूजा हेगडे, पावेल गुलाटी आणि कुब्रा सैत दिसणार आहेत. वृत्तानुसार, शाहिद या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Share this article