साहित्य : 2 वाटी चणा डाळ, 1 वाटी मूग डाळ, 5-6 हिरव्या व लाल मिरच्या, प्रत्येकी 1 टीस्पून लाल मिरची पावडर, हळद व धणे पावडर, 1 टीस्पून लसूण पेस्ट, 3 टेबलस्पून कापलेली कोथिंबीर, मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : चणा डाळ आणि मूग डाळ 5-6 तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर यातील पाणी निथळून जाडसर वाटून घ्या. मिरचीची पेस्ट तयार करा. आता वाटलेल्या डाळीत मिरचीची पेस्ट, लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, धणे पावडर मिसळा. कोथिंबीर व चवीनुसार मीठ मिसळा. मिश्रण एकजीव करा. यात पाणी टाकण्याची आवश्यकता नसते. आता या मिश्रणाचे हातावर वडे थापून मधोमध छिद्र करा. गरम तेलात हे डाळ वडे तळून सॉस वा हिरव्या चटणीसह सर्व्ह करा.
डाळ वडा- 2(Dal Vada- 2)
Link Copied