अलीकडेच वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर करून त्यांच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. प्रेग्नेंसीची घोषणा केल्यानंतर वरुण आणि नताशा मुंबई एअरपोर्टवर हात पकडताना दिसले. रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नासाठी हे जोडपे गोव्याला रवाना झाले आहेत.
https://www.instagram.com/reel/C3hXutNo-v0/?igsh=aHBqa3AyamlwODd4
निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि स्नीकर्स आणि टोपी घातलेला वरुण धवन नेहमीप्रमाणेच कमाल दिसत होता. पण सगळ्यांच्या नजरा नताशावर खिळल्या होत्या.
नताशा दलाल मोनोक्रोम आउटफिटमध्ये बेबी बंप कव्हर करताना दिसली.
वरुण आणि नताशा 21 फेब्रुवारीला रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईहून गोव्याला निघाले होते. रकुल आणि जॅकीच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
रकुल आणि जॅकीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी भूमी पेडणेकरही तिच्या बहिणीसोबत गोव्यात पोहोचली आहे.