'देवों के देव महादेव'मध्ये पार्वतीची भूमिका साकारणारी सोनारिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. आता या अभिनेत्रीच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली आहे. राजस्थानच्या रणथंबोरच्या शाही किल्ल्यात तिचा विवाहसोहळा पार पडला. आता, सोनारिका तिच्या लग्नसोहळ्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही नवविवाहित दांपत्य खूप खुश दिसत आहेत.
सोनारिका भदोरिया आणि तिचा पती विकास पराशर यांचे अखेर लग्न झाले आहे. त्यांच्या पोशाखाचे खूप कौतुक झाले. लग्नातील एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रत्येकालाच तिच्या लग्नाचे काही क्षण पाहण्याची उत्सुकता लागली.
सोनारिकाच्या मेहेंदीमध्ये तिच्या 'देवों के देव महादेव' या मालिकेची झलक पाहायला मिळाली. त्यात पार्वती आणि महादेव यांची प्रतिमा साकारण्यात आलेली. सोनारिकाने आपल्या मेहंदी समारंभासाठी आईच्या लग्नाचा लेहेंगा परिधान केला होता. लाल लेहेंगा आणि मॅचिंग दुपट्ट्यासह हिरव्या मखमली टॉप तिने घातलेला. विकासनेही मॅचिंग म्हणून हिरवा कुर्ता पायजमा घातला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनारिका विकासची भेट जिममध्ये झालेली. लग्न करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी दोघांनी तब्बल सात वर्षे एकमेकांना डेट केले.