साहित्य : 5 कांदे, बेसन, 2 टीस्पून आलं-लसूण व हिरवी मिरचीची पेस्ट, 1 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून हळद, चवीनुसार मीठ व तेल.
कृती : कांदा उभा परंतु पातळ कापून घ्या. कापलेल्या कांद्याला थोडा वेळ मीठ लावून ठेवा. यामुळे कांद्याला पाणी सुटेल. आता यात लाल मिरची पावडर, हळद, आले-हिरवी मिरची व लसणाची पेेेस्ट, धणे पावडर यात टाकून मिश्रण एकजीव करा. थोड्या वेळाने यात जिरेल इतके बेसन टाकून कांदा-भजीचे मिश्रण तयार करा. कढईत तेल गरम करून हाताने भजी सोडा. सोनेरी रंगावर तळून घ्या. कुरकुरीत कांदा भजी तळलेल्या मिरचीसह सर्व्ह करा.
Link Copied