500 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले आहेत. संपूर्ण देश श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन झाला असून राममंदिरासाठी पंतप्रधान मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे. आता शिल्पा शेट्टीने मोदीजींना पत्र लिहून राम मंदिराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांचे खूप कौतुकही केले आहे.
शिल्पा शेट्टीने पंतप्रधानांना उद्देशून एक पत्र लिहिले आणि देशातील कोट्यवधी लोकांची स्वप्ने पूर्ण केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत शिल्पाने प्राण प्रतिष्ठा हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगितले आहे. तिचे हे पत्र भाजप महाराष्ट्राच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आले आहे.
शिल्पाने तिच्या पत्रात लिहिले आहे की, "आदरणीय मोदीजी, काही लोक इतिहास वाचतात. काही लोक इतिहासातून शिकतात. पण तुमच्यासारखे लोक इतिहास बदलतात." "तुम्ही रामजन्मभूमीचा 500 वर्षांचा इतिहास बदलून टाकला आहे. माझ्या अंतःकरणापासून तुमचे आभार. या शुभ कार्यासोबत तुमचे नावही कायमचे भगवान श्री रामच्या नावाशी जोडले गेले आहे. नमो." राम जय श्री राम!
हे पत्र भाजपच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आले असून त्यावर लोक प्रतिक्रिया देत आहेत. 22 जानेवारीला अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचे आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक प्रसंगी विविध क्षेत्रातील दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले होते. अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, कतरिना कैफ यांसारख्या बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना आमंत्रणे मिळाली होती. शिल्पा शेट्टीला निमंत्रण मिळाले नसले तरी रामलल्लाच्या अभिषेकसाठी ती खूपच उत्साही दिसली. आणि आता तिने पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.