Close

‘तुमसे मिलु अपनी कहूं’ हे प्रेमगीत व्हॅलेंटाईन डे निमित्ताने प्रदर्शित : अश्विनी बागल-अक्षय सेठी या जोडीवर चित्रित झालेले गाणे (Romantic Song ” Tumse Milu Apni Kahu” Released On The Occasion Of Valentine Day)

'रावरंभा' या ऐतिहासिक चित्रपटामुळे अभिनेत्री अश्विनी बागल हिला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. यानंतर अभिनेत्री आता अक्षय सेठीसोबत 'तुमसे मिलु अपनी कहूं' या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसत आहे. या म्युझिक व्हिडीओच्या दिग्दर्शनाची धुरा सोनम शाह यांनी उत्तमरीत्या पेलवली असून डीओपी आदित्य मेहरने हे गाणं त्याच्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. या गाण्याला गायिका रितिका राज सिंगने आवाज दिला आहे, सतीश त्रिपाठी यांनी हे गाणं शब्दबद्ध केलं आहे.

याबाबत बोलताना अश्विनी म्हणाली, "मला या म्युझिक व्हिडीओमध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी अश्विन महाराज यांची आभारी आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्ये रिलीज झालेले हे गाणे रसिकांच्या हृदयाला भिडेल याची मला खात्री आहे." अश्विन महाराज यांनी संगीतबद्ध केलेले आणि सादर केलेले हे गाणे 'महाराज म्युझिक'च्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे.

Share this article