Close

ट्रिपल राइस (Triple Rice)


साहित्य : सॉससाठी : 2 बारीक चिरलेल्या कांद्याच्या पाती, दीड टेबलस्पून शेजवान सॉस, प्रत्येकी 1 लांबट चिरलेली फरसबी, गाजर व टोमॅटो, 4 टेबलस्पून तेल, 250 मिलि. चिकन स्टॉक, दीड टीस्पून मीठ, पाव टीस्पून काळी मिरी पूड, अर्धा टीस्पून साखर, पाव टीस्पून रेड चिली सॉस, अर्धा टीस्पून टोमॅटो सॉस, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर (थोड्या पाण्यात घोळून), स्वादानुसार मीठ.
भातासाठी : 200 ग्रॅम, शिजवलेला भात, 1 चकत्या केलेले छोटे गाजर, 2 तिरकी चिरलेली फरसबी, 1 उभा चिरलेला पातीचा कांदा, 2 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून सोया सॉस, अर्धा टीस्पून मीठ.
इतर साहित्य : 200 ग्रॅम फ्राइड नूडल्स.
कृती ः सॉससाठी ः एका मोठ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात सर्व भाज्या मोठ्या आचेवर 3 मिनिटांकरिता परतवून
घ्या. नंतर त्यात चिकन स्टॉक घालून 2 मिनिटे उकळवा. त्यात सर्व सॉस, मीठ व मसाले घालून मिनिटभर उकळवा.
सतत ढवळत त्यात कॉर्नफ्लोअरचे मिश्रण घालून 2 मिनिटे शिजवा आणि आच बंद करा.
भातासाठी : एका नॉनस्टिकच्या भांड्यात तेल गरम करून त्यात सर्व भाज्या व कांदा घालून मोठ्या आचेवर 1 मिनिटे परतवा. त्यात भात, मीठ व सोया सॉस घालून 2 मिनिटे परतवा. त्यात कांद्याच्या पाती घालून एकत्र करा व आच बंद करा.
सर्व्ह करताना सर्वप्रथम फ्राइड नूडल्स घालून त्यावर तयार केलेला सॉस व नंतर भात घाला. शेवटी बारीक चिरलेले गाजर
व कांद्याची पात घालून सजवा.

Share this article