यामी गौतमने २०२१ मध्ये 'उरी' सिनेमाचे दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केले होते. आता लग्नाच्या तीन वर्षांनी त्यांच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे. यामी गौतमने याबद्दल अद्याप जाहीर केले नसले तरी, एका रिपोर्टमध्ये याबाबत दावा करण्यात आला आहे.
'हिंदुस्तान टाईम्स'च्या वृत्तानुसार, यामी गौतमशी संबंधित सूत्रांनी अभिनेत्री पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. अभिनेत्री देखील आई होण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे म्हटले जाते.
मे महिन्यापर्यंत यामी गौतमच्या घरी छोटा पाहुणे येऊ शकतो असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. यामी गौतमने अद्याप ही गुड न्यूज शेअर केली नसली तरी तिचे चाहते मात्र खूप खुश झाले आहेत.
यामी गौतम सध्या तिच्या आगामी 'आर्टिकल ३७०' या चित्रपटावर काम करत आहे, ८ फेब्रुवारी २०२४ रोजी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सुहास यांनी केले असून त्यात प्रियमणी, इरावती हर्षे, किरण यांच्यासह अनेक कलाकार आहेत. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
यामी गौतमने ४ जून २०२१ रोजी आदित्य धरशी लग्न केले. दोघेही दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. दोघांची पहिली भेट २०१९ मध्ये 'उरी द सर्जिकल स्ट्राइक'च्या सेटवर झाली होती.