प्रियांका चोप्रा आणि निक हे परफेक्ट कपल आहे. वयात दहा वर्षांचा फरक असूनही दोघांनीही अतिशय सुंदर आणि जबाबदारीने आपलं नातं जपलं. 2018 मध्ये, दोघांनी राजस्थानमध्ये पारंपारिक ग्रँड वेडिंग केले होते. त्यानंतर त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न देखील केले होते, परंतु निकला अजूनही एका गोष्टीचा पश्चात्ताप आहे, ज्याचा त्याने आता खुलासा केला आहे.
निक त्याचे भाऊ केविन आणि जो जोनास यांच्यासोबत एका चॅट शोमध्ये सामील झाला. जिथे त्याला लाय डिटेक्टर सेशनमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. यापैकी एक प्रश्न असा होता की, निकला लग्नादरम्यान कधी वाटलं होतं की पुरे झालं, मी या लग्नसोहळा पूर्ण केला आहेत, यावर निकने हो म्हटलं… आणि हे उत्तर बरोबर असल्याचं आढळलं तर सगळ्यांनी मोठ्याने आवाज करायला सुरुवात केली. त्यांच्या भारतीय लग्नात साडेतीन कोटींहून अधिक खर्च झाला होता.
यानंतर निक म्हणाला की लग्नाचे बिल पाहून मला असे वाटलेले. त्याच्या या उत्तरावर सगळे हसले. निकची ही फनी स्टाइल चाहत्यांना खूप आवडली आहे.
येथे व्हिडिओ पहा https://www.instagram.com/reel/C0KGvkpO2Oq/?igsh=MzRlODBiNWFlZA==
यानंतर निकला असेही विचारण्यात आले की त्याला वाटते की तो त्याच्या भावांपेक्षा चांगला गायक आहे, तेव्हा विचार केल्यानंतर निक नाही म्हणतो आणि जेव्हा हे उत्तर चुकीचे असल्याचे आढळले तेव्हा सर्वजण पुन्हा हसलायला लागतात.
प्रियांकाबद्दल सांगायचे तर, लॉस एंजेलिसमध्ये पावसात ती निकसोबत रोमान्स आणि मॅगीचा आनंद घेत आहे. तिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर काही मनोरंजक फोटो शेअर केले आहेत.