Close

पद्मावतनंतर पुन्हा एकदा शाहिद कपूर साकारणार ऐतिहासिक भूमिका, दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेत ( After Padmaavat, Shahid Kapoor will once again play a historical role, in the character of Chhatrapati Shivaji Maharaj )

अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या क्रिती सेननसोबतच्या आगामी तेरी बातोंमे उलझा जियां या सिनेमासाठी चर्चेत आहे. बऱ्याच कालावधीनंतर तो मोठ्या पडद्यावर दिसेल. अशातच त्याच्याबद्दल आणखी एक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या पद्मावत या ऐतिहासिक चित्रपटात राजा रावल रतन सिंहची भूमिका साकारल्यानंतर शाहिद पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिका साकारण्यास सज्ज झाला आहे.

अभिनेता शाहिद कपूर लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसेल. ओह माय गॉड २ चे दिग्दर्शक अमित राय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, शाहिद कपूर ओ माय गॉड २ चे दिग्दर्शक अमित राय यांच्यासोबत या प्रोजेक्टवर चर्चा करत आहे. अश्विन वर्दे यांच्या ‘वाकाओ फिल्म्स’ या बॅनरची निर्मिती असलेला हा ऐतिहासिक चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित असेल. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाबाबत शाहिद आणि निर्मात्यांची चर्चा, आता जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे.

शाहिद कपूरचा तेरी बातों में ऐसा उल्झा जिया हा सिनेमा येत्या ९ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहिद अभिनेत्री क्रिती सेननसोबत दिसणार आहे. याशिवाय शाहिद कपूर देवा या चित्रपटात दिसणार आहे. शाहिदचा दुसरा चित्रपट देवा ची घोषणा ऑक्टोबर २०२३ मध्ये करण्यात आली होती.या चित्रपटातील शाहिदचा फर्स्ट लूकही समोर आला आहे.

Share this article