काही दिवसांपूर्वीच सलमान खानच्या बिग बॉस या वादग्रस्त शोच्या १७ व्या सीझनचा महाअंतिम सोहळा पार पडला. यावेळी स्टॅण्डअप कॉमेडीयन मुनाव्वर फारुकीचे नाव विजेता म्हणून घोषित केले गेले. अशातच आता या शो संबंधी आणखी एक माहिती बातमी समोर आली आहे. ही बातमी ११ व्या सीझन संबंधी आहे.
'बिग बॉस ११' च्या एका लोकप्रिय महिला स्पर्धकाने तिच्या मित्राने तिला फ्लॅटवर बोलावून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या स्पर्धकाने आपल्या मित्राविरुद्ध दिल्ली पोलीसांकडे तक्रार दाखल केली
'आज तक'ने दिलेल्या माहितीनुसार, ही महिला स्पर्धक खूप लोकप्रिय होती. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिला काही खास काम मिळाले नाही, पण ११व्या सीझनमध्ये तिची बरीच चर्चा झाली.
पोलिसांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवून घेण्यात आला असून त्यावर तपास सुरू करण्यात आला आहे. या स्पर्धकाची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.
'बिग बॉस ११' मध्ये शिल्पा शिंदे, अर्शी खान, हिना खान, बेनाफ्शा सूनवाला, विकास गुप्ता, हितेन तेजवानी, प्रियांक शर्मा, पुनेश, आकाश ददलानी, लव, बंदगी कालरा, सपना चौधरी, मेहजबी, शिवानी दुर्गा, ज्योती कुमारी, झुबेर खान, सब्यसाची सत्पती आणि ढिंच्यॅक पूजा हे स्पर्धक दिसलेले.
फोटो सौजन्य- सोशल मीडिया