क्रिस्पी स्पिनेच प्रॉन्स
साहित्य : 10 मध्यम आकाराची स्वच्छ केलेली कोळंबी, 10 पालकाची पाने, 1 टेबलस्पून गार्लिक चिली सॉस, 1 टीस्पून काळी मिरी पूड, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली लसूण, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : गार्लिक चिली सॉस, मीठ, काळी मिरी पूड व लसूण एकजीव करा. या मिश्रणामध्ये अर्ध्या तासाकरिता कोळंबी
मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्या. प्रत्येक कोळंबीवर एक पालकाचे पान व्यवस्थित गुंडाळा आणि टूथपिकच्या साहाय्याने बंद करा. गरम तेलामध्ये कोळंबी शिजून पालकाची पाने कुरकुरीत होईपर्यंत तळा.
Link Copied