Close

कॅन्सरशी लढा जिंकलेल्या चिमुकल्याची सलमानने घेतली भेट, छोट्या चाहत्याची इच्छा पूर्ण (Salman Khan Meets His Little Cancer Patient Fan)

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान लाखो लोकांच्या मदतीसाठी पुढे येतो. अनेकांच्या मदतीस तो नेहमीच पुढे असतो. एखाद्या कुठल्या गोष्टीचं प्रॉमिस केलं असेल तरी सलमान ते आवर्जून पूर्ण करतो. सलमान खान अलीकडेच त्याचा 9 वर्षीय चाहता जगनबीरला भेटला, या मुलाने केमोथेरपीच्या 9 राउंडनंतर कर्करोगाचा पराभव केला. 2018 मध्ये, सलमान खान पहिल्यांदा जगनबीरला मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये भेटला, जिथे 4 वर्षांच्या मुलावर त्याच्या ट्यूमरसाठी केमोथेरपी सुरू होती.

कॅन्सरशी लढा संपल्यानंतर सलमान खानने जगनबीरला बळ मिळावे म्हणून त्याला भेटण्याचे आश्वासन दिले होते आणि सलमान खान त्याला भेटायला आला होता. गेल्या वर्षी जगनबीरने कर्करोगावर मात केल्यामुळे, सलमानने डिसेंबर 2023 मध्ये त्याच्या वांद्रे येथील घरी भेट घेतली आणि जगनबीरच्या उपचारांच्या वाईट काळात त्याने दिलेले वचन पूर्ण केले.

'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत जगनबीरची आई सुखबीर कौर यांनी खुलासा केला की, वयाच्या 3 ऱ्या वर्षी जगनबीरच्या मेंदूमध्ये नाण्यांच्या आकाराचा ट्यूमर असल्याचे निदान झाले होते, त्यानंतर त्याची दृष्टी कमी होऊ लागली होती. या कठीण परिस्थितीला तोंड देत दिल्ली किंवा मुंबईत उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. जगनच्या प्रकृतीची काळजी घेऊन त्याचे वडील पुष्पिंदर यांनी त्याला मुंबईला नेण्याचा निर्णय घेतला. जगनला खात्री होती की तो सलमान खानला नक्कीच भेटेल.

सुखबीर कौरने खुलासा केला की, जगनला असे पाहून तिने सत्य न सांगण्याचा निर्णय घेतला. एकदा जगनबीर रुग्णालयात दाखल असताना सलमानला भेटण्याची इच्छा व्यक्त करणारा व्हिडिओ बनवण्यात आला होता. जगनबीरला भेटवेन असे वचन दिल्याचा तो व्हिडिओ सलमानपर्यंत पोहोचला. भावनांनी भरलेल्या जगनने सलमानच्या चेहऱ्याला आणि त्याच्या छातीला स्पर्श केला. सुखबीरने आनंदाने सांगितले की त्यांचा मुलगा आता बरा आहे, त्याची 99 टक्के दृष्टी परत आली आहे आणि तो दररोज शाळेत जातो.

सलमान शेवटचा 'टायगर 3' मध्ये कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीसोबत दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली.

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Share this article