Close

बॉलिवूडकर ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येकडे रवाना (Bollywood Stars Off To Ayodhya For Ram Mandir Inauguration )

आज 22 जानेवारी हा ऐतिहासिक दिवस देशासाठी अभिमानाचा दिवस आहे. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर आणि प्रतिक्षेनंतर अयोध्येत राम मंदिर तयार झाले असून आज प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये अनेक पाहुणे सहभागी होत आहेत. संत-महात्मांपासून ते अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींपर्यंत आमंत्रित करण्यात आले आहे. हे कलाकारही त्यात पूर्ण भक्तीभावाने आणि उत्साहाने सहभागी होत आहेत.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टही अयोध्येला पोहोचले आहेत. कतरिना कैफ आणि विकी कौशलही पोहोचले आहेत. त्यांच्या आधी अभिषेक बच्चनसोबत बिग बी अयोध्येला रवाना झाले होते.  

या स्टार्सच्या पारंपारिक लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. विशेषतः रणबीर कपूरच्या धोती-कुर्त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जेव्हा रणबीर धोती-कुर्ता आणि शालमध्ये विमानतळावर स्पॉट झाला तेव्हा त्याचा लूक व्हायरल झाला. रणबीरला हा पारंपारिक लुक खरोखरच शोभत होता. आलिया भट्टनेही निळ्या रंगाची साडी नेसली होती आणि या पारंपरिक लूकमध्ये या कपलला पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. त्याच्यासोबत दिग्दर्शक रोहित शेट्टीही दिसला.

केवळ रणबीर-आलियाच नाही तर कतरिना आणि विकी कौशल देखील पारंपारिक लूकमध्ये दिसले. कॅटने पिवळी साडी घातली होती आणि विकीने पांढरा कुर्ता-पायजमा घातला होता. बिग बी कुर्ता-पायजमा आणि जॅकेटमध्येही दिसले. माधुरी दीक्षित आणि नेने देखील स्पॉट झाले होते. माधुरीने पिवळी साडी तर नेनेंनी कुर्ता-पायजमा घातला होता. याशिवाय जॅकी श्रॉफ, सोनू निगम, विवेक ओबेरॉय हे देखील अयोध्येत पोहोचले आहेत. कंगना आधीच अयोध्येला पोहोचली होती तिने मंदिरातही झाडू मारली होती

Share this article