साहित्य : 100 ग्रॅम बेबीकॉर्न (उकडून एक इंचाचे तुकडे केलेले), 100 ग्रॅम मशरूम (स्वच्छ करून चार भाग केलेले), प्रत्येकी 1 टीस्पून बारीक चिरलेले लसूण व सेलेरी, 1 बारीक चिरलेला कांदा, 3-4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1-2 बारीक चिरलेल्या लाल मिरच्या, पाव टीस्पून मीठ, प्रत्येकी 2 चिमूट अजिनोमोटो, काळी मिरी पूड व साखर, प्रत्येकी 1 टीस्पून डार्क सोया सॉस व ग्रीन चिली सॉस.
कृती : नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लसूण, कांदा, सेलेरी, लाल व हिरव्या मिरच्या घालून 30 सेकंद मोठ्या आचेवर परतवा. दोन्ही सॉस आणि थोडे पाणी घालून परतवा. त्यात बेबी कॉर्न, मशरूम, मीठ, अजिनोमोटो, काळी मिरी पूड व साखर घालून मिश्रण सुके होईपर्यंत परतवा. बेबीकॉर्न मशरूम चिली गरमागरम सर्व्ह करा.
बेबीकॉर्न मशरूम चिली (Baby Corn Mushroom Chilli)
Link Copied