Close

रोहित शेट्टी घेऊन येतोय गोलमाल ५, अभिनेत्याची मोठी घोषणा ( Rohit Shetty’s Golmal 5 will Release In Next Two Years)

बॉलिवूडमध्ये काही सिनेमांना प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळते. त्यामुळेच लोकआग्रवास्तव त्याचे पुढचे पार्टही काढले जातात. असाच एक सिनेमा म्हणजे गोलमाल. या सिनेमाचे आतापर्यंत ४ पार्ट आले आहेत. आता या सिनेमाबद्दल नवी घोषणा करण्यात आली आहे.

सिनेमाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने नुकतीच गोलमाल ५ ची घोषणा केली. पिंकविलाशी बोलताना रोहितने स्पष्टपणे सांगितले की, "गोलमाल ५ नक्कीच बनणार आहे." तो म्हणाला, मला जरा तो लवकर बनवावा लागेल. मला वाटतं पुढच्या २ वर्षात तुम्हाला गोलमाल ५ मिळेल. सिनेमातील अलीकडचे बदल लक्षात घेता गोलमाल फ्रँचायझीचा पुढील चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा अधिक भव्य असेल.

रोहित पुढे म्हणाला, “मला वाटतं, आजच्या काळात, मी त्या वेळी बनवलेल्या ऑल द बेस्ट आणि गोलमालसारख्या चित्रपटांपेक्षा हा सिनेमा अधिक भव्य आणि मोठा असू शकतो. मोठा म्हणजे अॅक्शनवगैरेने मोठा नाही. मी गोलमालमध्ये अॅक्शन जोडू शकत नाही, परंतु मी जॉनरची स्केल वाढवू शकतो. गोलमालचे बरेच चाहते आहेत आणि मी हा ब्रँड चाहत्यांसाठी तयार करत आहे. पुढचा गोलमाल चित्रपट हा कॉमेडी फ्रँचायझी असला तरीही मोठा आणि चांगला असेल.

रोहितने त्याच्या 'कॉप-व्हर्स'वर आधारित नसलेला चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तो म्हणाला, “मलाही ‘चेन्नई एक्स्प्रेस’सारखा चित्रपट बनवण्याची गरज वाटत आहे. जर मला चांगली आणि मोठी चांगली अशी कथा सापडली तर मी नवीन चित्रपट करेन.

Share this article