Close

प्रेग्नंसीनंतर दिड वर्षांनी सोनम कपूरने घटवले २० किलो वजन, दाखवली ट्रान्सफॉर्मेशन जर्नी (Sonam Kapoor lost 20 kg after pregnancy one and a half years)

सोनम कपूरने 2018 मध्ये लग्न केले आणि 2022 मध्ये मुलगा वायुला जन्म दिला. गरोदरपणात जसं सर्व महिलांसोबत घडतं, तसंच सोनमसोबतही झालं. आई होण्यासोबतच सोनमचे वजनही खूप वाढले आणि आता तब्बल दीड वर्षानंतर तिने प्रेग्नेंसीनंतरचे वजन नियंत्रित केले आहे. सोनम कपूरने वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली.

सध्या सोनम चित्रपटांपासून दूर आहे आणि आपल्या मुलाच्या वायुच्या संगोपनात व्यस्त आहे. ऑगस्ट 2022 मध्ये आई झालेली सोनम आता स्वतःच्या कामात व्यस्त आहे. खूप घाम गाळल्यामुळे सोनमला गरोदरपणात वाढलेले वजन नियंत्रित करण्यात यश आले आहे. सोनमने तिच्या वर्कआउट क्षणाची झलक इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे, ज्यामध्ये ती जिम वेअरमध्ये दिसत आहे.

या व्हिडीओ क्लिपमध्ये सोनम तिच्या कॅमेऱ्याने स्वत:ला शूट करताना दिसत आहे. अभिनेत्रीने तिचे 20 किलो वजन कमी केले आहे. एवढेच नाही तर या पोस्टमध्ये तिने आपले टार्गेटही नमूद केले आहे. सोनमने सांगितले की, तिला अजून जास्त मेहनत करावी लागेल आणि आणखी 6 किलो वजन कमी करावे लागेल.

यापूर्वी सोनमने तिच्या एका पोस्टमध्ये सांगितले होते की तिने 16 महिने डाएट आणि वर्कआउटची काळजी कशी घेतली आणि आता तिचे शरीर पुन्हा पूर्वीसारखे आकारात आले आहे., तिने सांगितले होते की यासाठी तिने कधीही क्रॅश डाएट किंवा विचित्र वर्कआउटचा अवलंब केला नाही, स्वत: ची आणि मुलाची काळजी घेत त्यावर नियंत्रण ठेवले आहे.

Share this article