Close

‘बिग बॉस’ फेम सई लोकूरने लेकीचं केलं बारसं, ठेवलं हे खास नाव… (Naming Ceremony of Sai Lokur’s Daughter)

 ‘बिग बॉस’ फेम सई लोकूरने गेल्या महिन्यामध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला असून नुकतंच तिचं बारसं झालं आहे. सई कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने सोशल मीडिया पोस्टवरून चाहत्यांना मुलीची पहिली झलक दाखवत, नाव सांगितलं आहे. तिनं मुलीचं नाव ‘ताशी’ असं ठेवलं आहे. सोबत तिने बाळाचे पाय, तिचा हात आणि तिच्या पतीचा हात असा फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री पोस्टमध्ये बोलते, “... आणि आज आम्ही एक महिन्याचे झालो. आमचे आनंद, आमचं गोंडस बाळ, आमची परी ताशी रॉय. माझी डार्लिंग आज एक महिन्याची झाली आहे. आई-बाबा तुझ्यावर जीवापाड प्रेम करीत आहेत. तू आम्हाला तुझे पालक म्हणून निवडलंस आणि पालकत्वाचा विशेषाधिकार दिलास त्याबद्दल तुझे मनापासून आभार. तू या जगातली खूप सुंदर गोष्ट आहेस. ताशीचा अर्थ समृद्धी आणि शुभ असा होतो.” असं अभिनेत्रीने आपल्या पोस्टला कॅप्शन दिले. अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान अभिनेत्रीने एका मराठी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या मुलीच्या नावाचा अर्थही सांगितला आहे. “मी ‘ताशी’चं नाव आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी ठरवलं होतं. ‘समृद्धी’ असा ताशीच्या नावाचा अर्थ होतो. मी अन्‌ तिर्थदीप लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सिक्कीमला गेलो होतो. तिकडे फिरत असताना मला ताशी View Point (व्ह्यू पॉइंट) दिसला होता. तेव्हाच मी माझ्या नवऱ्याला बोलले की, आपल्याला जर मुलगी झाली तर तिचं नाव आपण ‘ताशी’ ठेवायचं.”

'खूप गोड नाव आहे', 'ब्यूटिफूल नाव, ताशी खूप सुंदर नाव आहे. तुला खूप खूप आशिर्वाद' असं म्हणत चाहत्यांनी सईच्या लेकीच्या नावाचे कौतुक केले आहे.

Share this article