प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची लाडकी मुलगी मालती मेरी १५ जानेवारीला २ वर्षांची झाली. या जोडप्याने त्या दिवशी आपल्या मुलीचा वाढदिवस लॉस एंजेलिसच्या सुंदर बीचवर कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांसह साजरा केला.
त्यानंतर प्रियांका आणि निक यांनी मुलीसाठी इल्मो थीम असलेली वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती.
या जोडप्याने त्यांच्या लहान मुलीसाठी आणखी एक वाढदिवसाची पार्टी आयोजित केली. मालती मेरीची ही बर्थडे पार्टी इल्मो थीमवर आधारित होती.
इल्मो थीमवर आधारित वाढदिवसाच्या पार्टीला त्यांच्या जवळचे मित्र, कुटुंबातील सदस्य आणि मित्र उपस्थित होते.
मालतीचे वडील निक जोनासने वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो शेअर केले आहेत ज्यात संपूर्ण कुटुंब आणि मित्र एकत्र मजा करताना दिसत आहेत.
बर्थडे पार्टीच्या या फोटोंमध्ये बर्थडे गर्ल टियारासह गुलाबी रंगाचा ड्रेस घालून कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे.
इतर फोटोंमध्ये कपल त्यांच्या मित्रांसोबत पोज देताना दिसत आहे.