आंतरराष्ट्रीय स्टार बनलेल्या प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांची मुलगी मालती मेरी जोनास काल म्हणजेच सोमवारी 2 वर्षांची झाली.
लॉस एंजेलिसच्या सुंदर बीचवर या जोडप्याने आपल्या लाडक्या मुलीचा वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा केला. मालती मेरीची वाढदिवसाची पार्टी एक जिव्हाळ्याचा उत्सव होता, ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची मुलगी मालती मेरीच्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ एका फॅन पेजला शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक क्लिपही आहे. क्लिपमध्ये प्रियांका आणि निक पार्टीपासून दूर बीचवर हातात हात घालून फिरताना दिसत आहेत.
याशिवाय, व्हिडिओमध्ये कपलचे मित्र कॅव्हानॉफ जेम्स आणि दिव्या अखुरी देखील वाढदिवसाच्या सेट अपमध्ये कपलला मदत करताना दिसत आहेत. बर्थडे गर्लची झलक स्पष्ट दिसत आहे.
व्हिडिओमध्ये निकचा भाऊ फ्रँकी जोनासही दिसत आहे.
व्हिडीओ पाहून असे दिसते की, वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यच सहभागी झाले आहेत.