सिद्धार्थ मल्होत्राचा आज त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त पत्नी कियारा अडवाणीने अभिनेत्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
काल, कियाराचे पालकही या जोडप्याच्या घराबाहेर स्पॉट झाले होते. आता किआराने स्वतः इंस्टाग्रामवर एक स्टोरी अपलोड करून पतीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. व्हिडिओमध्ये कियारा खूप आनंदी दिसत आहे.
कियारा आणि सिद्धार्थसोबत व्हिडिओमध्ये केकही खास दिसत होता.
कियारा अडवाणीने लिहिले 'हॅपी बर्थडे लव्ह'
कियारा अडवाणीने वाढदिवसाच्या पार्टीची छोटीशी झलक शेअर केली आहे. अभिनेत्रीने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
काळ्या ड्रेसमध्ये कियारा खूपच सुंदर दिसत आहे. तर सिद्धार्थने रंगीत टी-शर्ट घातला आहे. व्हिडिओमध्ये दोघेही रोमँटिक मूडमध्ये दिसत होते आणि एकमेकांना किस करताना दिसत होते.
यासोबत कियाराने कॅप्शनमध्ये 'हॅपी बर्थडे लव्ह' लिहून तिचे प्रेम व्यक्त केले.