‘गदर २’ च्या विक्रमी यशानंतर सनी देओल ‘सफर’ या नव्या चित्रपटात मग्न झाला आहे. या चित्रपटाचे ५ दिवसांचे आऊटडोअर शूटिंग नुकतेच चंदिगढ व मनाली येथे पार पडले. कडाक्याची थंडी आणि हिमवर्षावात हे शूटिंग झाले. मनालीमध्ये तर थंडी आणि बर्फ यांसह धुके होते. अन् तापमान उणे २० अंश इतके होते. तरी सर्व कलाकार तंत्रज्ञांनी या प्रतिकूल हवामानात आपले काम पूर्ण केले.
‘सफर’ मध्ये सिमरन बग्गा ही सनी देओलची नायिका असून ‘प्रवास’ या मराठी चित्रपटावरून तो बेतला आहे. प्रवासचे निर्माते ओम छंगानी यांनीच सफरला हात घातला असून दिग्दर्शन शशांक उदापूरकर यांचे आहे.
Link Copied