तिळाची चटणी
साहित्य : 1 वाटी तीळ, अर्धा वाटी खोबर्याचा कीस, पाव वाटी कढीपत्ता, काही लसणाच्या पाकळ्या, स्वादानुसार तिखट, मीठ व साखर.
कृती : तीळ, खोबर्याचा कीस व कढीपत्ता वेगवेगळे भाजून घ्या. सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून वाटून घ्या.
तिळाची मिरची
साहित्य : अर्धा वाटी हिरव्या मिरचीचे तुकडे, 1 वाटी किसलेले सुके खोबरे, अर्धा वाटी तीळ, स्वादानुसार मीठ, चिमूटभर साखर, फोडणीकरिता तेल, हिंग, मोहरी व हळद, थोडा लिंबूरस.
कृती : तेल गरम करून त्यात फोडणी करा. मोहरी तडतडल्यावर त्यात मिरच्यांचे तुकडे घालून परतवा. नंतर त्यात खोबरे व तीळ घालून चांगले परतवा. त्यात मीठ व साखर घालून एकत्र करा व आच बंद करा. नंतर त्यात लिंबूरस एकत्र करा.