अभिनेता रणबीर कपूरची फी दुपटीने वाढल्याचे बोलले जात आहे. अॅनिमल चित्रपटाच्या यशामुळे अभिनेत्याने आपले स्टारडम लेव्हल २ वरून ५ व्या स्तरावर वाढवले असल्याचे बोलले जात आहे.
अॅनिमल'च्या यशानंतर रणबीर कपूरने त्याची फी ३० कोटींवरून ६५ कोटी रुपये केली आहे. मात्र त्याच्याकडून यावर कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. तसेच 'अॅनिमल'साठी रणबीरने ७० कोटी रुपयांची फी घेतली असे म्हटले आहे.
‘संजू’ चित्रपटाच्या यशानंतरही रणबीरने फी वाढवली होती. एका जाहिरातीसाठी त्याने आपली फी ८ कोटींवरून १२ कोटी रुपये केली होती. 'संजू'मध्ये संजय दत्तची भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूरने २५ कोटी रुपये घेतले होते.
रणबीरची पत्नी आलिया भट्ट तिच्या स्क्रिप्टनुसार फी घेते. 'ब्रह्मास्त्र'साठी तिने १० ते १२ कोटी रुपये घेतले होते. तर 'गंगूबाई काठियावाडी'साठी सुमारे २० कोटी रुपये आकारले होते.
अॅनिमल बद्दल बोलायचे झाल्यास या सिनेमाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले असून जगभरात ९०० कोटींहून अधिकची कमाई झाली आहे. अजूनही काही ठिकाणी बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चालू आहे.