बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान आणि रीना दत्ताची मुलगी इरा खानने 10 जानेवारी रोजी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत लग्न केले. राजस्थानमधील उदयपूर येथे हा विवाहसोहळा पार पडला, तिथे मेहंदी, संगीत, हळदी समारंभासह ख्रिश्चन पद्धतीने विवाह सोहळा पार पडला.
काल, आमिर खानने मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये आपली मुलगी आणि जावई इरा व नुपूर यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन केले होते,
ज्यामध्ये संपूर्ण बॉलिवूड तसेच अंबानी कुटुंबाने हजेरी लावली होती. आता इरा आणि नुपूरच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Link Copied