Close

विदेशी तरुणीने ए आर रहमानसमोर गायले मां तुझे सलाम हे गाणं, व्हिडिओ व्हायरल (The foreign young Female Fan Sings Maa Tujhe Salam in front of AR Rahman)

भारतीय गायक एआर रहमान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत त्यांची एक चाहती गायकाची गाडी थांबवून त्यांचेच गाणे ऐकण्याची विनंती करताना दिसतेय. ती कोणी भारतीय नसून एक विदेशी तरुणी आहे.  व्हिडिओत ती रहमान यांचेच 'मां तुझे सलाम' हे गाणे गात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत रहमान आपल्या कारमधून जात असताना अचानक एक चाहती त्यांच्याजवळ त्यांना सांगते की, ' तुम्ही माझे आदर्श आहात. मी तुमच्यासाठी काही गाऊ शकते का?' यावर रहमानही हो असे म्हणातात.

मग ती परदेशी मुलगी गिटार वाजवते आणि रहमान यांच्याच लोकप्रिय गाण्यांपैकी एक 'मां तुझे सलाम' हे गाणे गाते. चाहतीने स्वत: आपल्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला असून रहमान यांचे गाण्याची संधी दिल्याबद्दल आभारही मानले आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Célinedee Matahari नावाची ही चाहती एक संगीतकार असून ती मूळची दुबईची आहे. तिने अनेक म्युझिक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. इंस्टाग्रामवरही तिची फॅन फॉलोइंग चांगली आहे. ती गात असताना तिचा व्हिडिओ ए आर रहमान हे देखील काढताना दिसतात हे विशेष.

Share this article