काही महिन्यांपुर्वी रिलीज झालेल्या केजीएफ चाप्टर 2 नंतर रविना टंडनच्या आगामी कर्मा कॉलिंग या सिरीजची घोषणा झालीय. या सिरीजमध्ये रविना ग्लॅमरस अंदाजात दिसतेय. नुकतंच या वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज झालाय.
कर्मा कॉलिंगच्या ट्रेलरमध्ये चकचकीत, ग्लॅमर आणि ऐश्वर्याने भरलेले कोठारी साम्राज्य दिसतं. हे एक श्रीमंतांचे जग आहे. परंतु या श्रीमंती जगात अनेक रहस्यं दडली आहेत.
Disney + Hotstar ने त्यांच्या बहुप्रतिक्षित कर्मा कॉलिंग सीरिजचा ट्रेलर लाँच केला आहे. कर्मा कॉलिंग मध्ये अलिबागची राणी इंद्राणी कोठारी (रवीना टंडन) कर्मा तलवार (नम्रता शेठ) शी लढण्यासाठी सज्ज आहे. ट्रेलरमध्ये अनेक रहस्ये दडली आहेत. अल्पावधीतच या ट्रेलरला लोकांनी पसंती दर्शवली आहे.
रुची नारायण दिग्दर्शित या वेबसिरीजमध्ये रवीना टंडन, नम्रता शेठ, वरुण सूद याशिवाय गौरव शर्मा, वालुशा डिसूझा, एमी आला, विराफ पटेल, पियुष खाटी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
कर्मा कॉलिंग यू.एस. मूळ मालिका 'रिव्हेंज'वर आधारित आहे, जी 2011-2015 मध्ये प्रसारित झाली होती. याशिवाय डिस्ने टेलिव्हिजन स्टुडिओचा एक भाग असलेल्या ABC सिग्नेचरने त्याची निर्मिती केली होती.
हॉटस्टार स्पेशलची कर्मा कॉलिंग वेबसिरीज २६ जानेवारी २०२४ पासून Disney+ Hotstar वर पाहायला मिळेल!